
साहील पंकज अग्रवाल परिवाराचा वतीने वर्षाच्या अखेरच्या दिवशी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करुन 2019 वर्षाला निरोप दिला.
यावेळी शंकर गुंड, रवि पाठक, अँड विवेक हिरोळीकर, सतिष पांचाळ सह अनेकांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पंकज अग्रवाल, सचिन अग्रवाल सह अग्रवाल परिवाराने परिश्रम घेतले.