उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 शिक्षण महर्षी सुभाष (दादा)कोळगे सहकारी पतसंस्थेच्या 2020 दिनदर्शिकेचे प्रकाशन आज शनिवार (दि4) रोजी उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी व नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
समर्थ नगर येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन रामदास कोळगे यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार श्री माळी म्हणाले की, पतसंस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच पतसंस्थामधील ग्राहकांच्या ठेवी कशा सुरक्षित राहतील  याकडे संस्थांनी कटाक्ष पाळला पाहिजे. तसेच सहकार कायद्याने वेळोवळी अपडेट केलेल्या नियम व निकषाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत संस्थेकडून दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या दिनदर्शिकेचे कौतूक केले.
यावेळी चेअरमन रामदास कोळगे यांनी तहसीलदार गणेश माळी यांचा शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. तर जेष्ठ सभासद दिलीप पडवळ यांनी नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांचा शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमास संस्थेचे सभासद विलास सरकाळे, दिलीप पडवळ, सुभाष कदम-पाटील, शाहुराज कोळगे, मधुकर यादव, अजिज शेख, मुकेश गायकवाड यांच्यासह कर्मचारी अर्जुन राऊत, माधुरी शिंदे, श्रीकांत काशिद, शाम शेरखाने आदिंची उपस्थिती होती. शेवटी आभार व्यवस्थापक शाम गंगावणे यांनी मानले. 
 
Top