उमरगा /प्रतिनिधी-
आपल्या देशाने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे . देशाच्या सर्वांगीण विकासात युवकांचा मोठा सहभाग लाभला आहे. देशाच्या सर्वांगीण विकासा करीता आता युवक क्रक्रांती होण्याची गरज आहे . असे सांगून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यानी केले .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी येथे 1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधी दरम्यान " ग्रामस्वच्छता व जलसंवर्धन " या साठी राष्ट्रीय सेवा योजनेनेच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी ते बोलत होते .मल्लीनाथ दंडगे , अॅड. विरसंगप्पा आळंगे,प्राचार्य डॉ. दिलीप गरूड , सरपंच शांताबाई पवार , नरेंद्र सुर्यवंशी , गोपाळराव चिट्टे , बालाजी चिट्टे , चंद्रहर्ष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या देशातील सर्व क्रक्रांत्या युवकांच्या सक्रीय सहभागा मुळेच शक्य झाल्या आहेत. शिक्षणाचा प्रसार आता गावागावाच्या वाडी तांड्या पर्यंत पोंहचला आहे . शिक्षणाचा खरा उपयोग आता सक्षम आणि सुंस्कारीत पिढया घडविण्यासाठी करण्याची गरज आहे . तरुण हा आपल्या देशाची संपत्ती आहे .समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे . राष्ट्रीय सेवा योजना हि युवा वर्गाला समाज सेवेची विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली संधी आहे . राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकानी समाजिक आदर्श निर्माण करावा . आपल्या श्रमदानातून श्रमाची प्रतिष्ठा पणाला लावून समाजाचा पर्यायाने राष्ट्राचा सर्वांगीण विकास करा,असे पाटील म्हणाले .
या वेळी प्राचार्य डॉ . दिलीप गरूड , अॅड .विरसंगप्पा आळंगे, अमर सुर्यवंशी ,यांची भाषणे झाली. प्राचार्य डॉ .दिलीप गरूड म्हणाले कि महाविद्यालयीन जीवना पासून विद्यार्थ्याना समाजसेवेचे धडे मिळावेत या साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाच्या वतीने सर्वत्र राष्द्रीय सेवा योजना शिबिराचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे . शिबिर कालावधि दरम्यान कृषि, अरोग्य , शिक्षण , ग्रामस्वच्छता , जलसंवर्धन , या विविध विषयावर परिसंवाद , चर्चा सत्रांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे . राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधना बरोबरच विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ग्रामस्वच्छतेची व जलसंवर्धनाची विविध कामे सात दिवसाच्या कालावधि दरम्यान हाती घेण्यात येणार आहेत . या कामी ग्रामस्थानी आपला सहभाग नोंदवावा असे अवाहन डॉ. गरूड यानी केले.
या वेळी तात्याराव मोरे वादविवाद स्पर्धत प्रथम क्रक्रमांकाचे यश संपादन केल्या बद्दल श्रमजीवी अद्यापक महाविद्यालयाचा विद्यार्थी अमर सुर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ . सुरेश कुलकर्णी यानी केले .सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ . बालाजी मोरे यानी केले .आभार प्रा.डॉ. उदय दिंडोरे यानी मानले
 
Top