तुळजापूर/प्रतिनिधी-
शिवसेनेचे मंञी अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही तर सुरुवात असुन यापुढे अनेक आमदार मंञी राजीनामा देतील व दोन महिन्यात सरकार कोसळणार  असल्याने हे सरकार फसवणूक करणारे अल्पकालीन सरकार ठरेल, अशी माहीती माजी मुख्यमंञी तथा खा. नारायण राणे यांनी देवीदर्शनानंतर पञकारांशी बोलताना दिली.
शनिवार दि. 4 रोजी माजी मुख्यमंञी  तथा खा. नारायण राणे यांनी पत्नी निलीमा सुन व नातवासह देविदर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारिक पुजारी विशाल छञे व राम छञे यांनी केली. देवीदर्शनानंतर पञकारांशी बोलताना म्हणाले की, सरकार येवुन सव्वा महिना झाला. परंतू खाते वाटप नाही, कँबीन, बंगले, दालने घेतली माञ कारभार सुरु नाही त्यामुळे जनतेचे प्रश्र सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत. विद्यमान मुख्यमंत्र्यांना प्रशासन चालविण्याचा एक टक्का अनुभव नाही. याचा अभ्यास नसल्याने प्रशासनावर वचक नाही. कर्जमाफी वर बोलताना म्हणाले की, जीआर मध्ये कर्जमाफीची तारीख नाही अर्थिक तरतूद नाही सगळ फसवाफसवी चालू आहे. यांनी शेतक-यांच्या तोंडाला पानी पुसले आहे, असा आरोप केला.
शिवसेना हिंदुत्ववादी तर कांँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस धर्म निरपेक्षवादी असे वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकञ आले असुन  ही मंडळी महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वताच्या हितासाठी एकञ आल्याचा आरोप करुन हे सरकार महाविकास आघाडीचे नसुन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस चे आहे, शिवसेना कांँग्रेस  हे नामदारी असल्याची खरमिरीत टिका केली.
उध्दव आदित्य ठाकरे यांच्या मंञीपदा बाबतीत बोलताना राणे म्हणाले की, यांनी स्वताचा घरात दोन मंञीपद घेतले गेली पन्नास वर्षापासून निष्ठेने काम करणा-या शिवसैनिकांना यांनी डावलुन अन्याय केल्याचा आरोप केला. सामना चालत नाही दुसरा कुठला उधोग धंदा नाही मुंबई महानगर पालिकेच्या जीवावार  यांचा संसार चालत आहे.  त्यामुळे ठाकरे हे कमविण्यासाठी सत्तेत आल्याची खरमिरीत टिका यावेळी केली. खा. संजय राऊत यांच्या भावाला मंञी न केल्याने तेही या सरकार वर नाराज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
 
Top