उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2020 निमित्त वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबीरामध्ये शहरातील सर्व वाहन चालक यांची आरोग्याची तपासणी करण्यात आली.
यावेळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पालवे,उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, पोलीस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड, वाहतूक पोलीस निरीक्षक श्री  धरमसिंग चव्हाण, पोहेकॉ सावरे,पोना सदावर्ते,पोना कोळी ,पो कॉ नरवडे, पो. कॉ राऊत, पो. कॉ. गायकवाड, पो.कॉ शिरगिरे आदींसह शहरातीलरिक्षा चालक, वाहतूक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top