उस्मानाबाद/प्रतिनिधी  -
उस्मानाबाद चे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक  रविंद्र भारत थोरात   (48) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि.13 जानेवारी 2020 रोजी रात्री 11.30 वा. आश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे निधन झाले ते काल रात्री 6 वा. दरम्यान ऑफिस मध्ये कामकाज करत असताना त्यांना छातीत अचानक धडधड होत दुखू लागल्याने त्यांना डंबळ हॉस्पिटल येथे नेण्यात आले व तेथून अश्विनी हॉस्पिटल सोलापूर मध्ये दाखल करण्यात आले. परंतू उपचार चालू असताना रात्री 11.30 वाजता त्याचा मुत्यु झाला. रविंद्र थोरात उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्च्यात  पत्नी, दोन मुले व आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे.
 
Top