उस्मानाबाद/प्रतिनिधी-
९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत घेण्यासाठी मी स्वत: प्रत्येक बैठकीत आग्रह केला, कारण जिल्हयातील शेतकरी व दुष्काळग्रस्तांची समस्या या संमेलनात चर्चेली जातील, त्यामुळे पाठिंबा देत गेलो. परंतू या साहित्य संमेलनामध्ये कोणत्याही प्रश्रावर अथवा समस्येवर चर्चा झाली नाही, उलट राजकीय नेते वाईट आहेत, असा संदेश देत साधी मला निमंत्रण पत्रिका ही देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी व दुष्काळग्रस्तांच्या समस्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी लवकरच राजकीय नेत्यासह साहित्य संमेलन घेणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिली.
गुरूवार दि.१६ जानेवारी रोजी दुपारी पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष राजे निंबाळकर म्हणाले की, अनेक राजकाण्यामध्ये साहित्यीक आहेत. त्यांना वाव देणे आवश्यक होते. परंतू साहित्य महामंडळाच्या कांही लोकांनी राजकारण्यांना दुर ठेवा, अशा प्रकारची वागणूक मंत्रीसहीत राजकीय नेत्यंाना देण्यात आली. ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत व्हावे म्हणून न.प.च्या वतीने अनेक कामे केली. येणा-या साहित्यीकांना सोईसुविधांचा अभाव नसावा, त्या दृष्टकोनातून प्रयत्न केले, असे असताना साधे निमंत्रण पत्रिका सुध्दा मला देण्यात आली नाही, एवढच जर राजकीय नेत्यंाची अॅलर्जी असेल तर मदत कशाला मागता असा सवालपण त्यंानी उपस्थित केला.गेल्या दोन दिवसापासून जिल्हयातील आजी-माजी आमदार, खासदार यांच्याशी संपर्क साधला आहे. लवकरच साहित्य संमेलन घेण्यासाठी बैठक घेऊ, बैठकीत जे कांही ठरल ते आपणास सांगू, असे स्पष्टपणे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

 
Top