लोहारा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील डिग्गी येथील पंडित नेहरू सामाजिक व शैक्षणिक संस्थे‘या वतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा यावर्षीचा रा’यस्तरीय नारीशक्ती गौरव पुरस्कार तालुक्यातील गुंजोटी गणा‘या पंचायत समिती सदस्या सौ. क्रक्रांतीताई व्हटकर यांना  डिग्गी येथील आयोजित कार्यक्रमात  सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 या कार्यक्रमा‘या अध्यक्षस्थानी डिग्गी‘या सरपंच सौ. उर्मिलाताई गायकवाड होत्या. तर प्रमुख म्हणुन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, डॉ. दिपक पोफळे डॉ. उदय मोरे, माजी आरोग्य उपसंचालक डॉ. मुकींद डिग्गीकर, उपसरपंच युवराज कर्पे, सिध्दाराम हत्तरगे, गुंजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर, बालाजी पोतदार, संस्थेचे सचिव प्रा. युसुफ मुल्ला, रोटरीचे माजी अध्यक्ष प्रविण स्वामी, पुरस्कार गौरव समितीचे अध्यक्ष सुमित कोथिंबीरे, जिजाऊ ब्रिगेड‘या तालुकाध्यक्षा रेखा पवार, संस्थेच उपाध्यक्ष ?ड. फिरोज मुल्ला, मधुकर गायकवाड  आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघा बुक्का, सुमय्या जमादार, अश्विनी जोशी, अरुणा सुरवसे, अंजना वालिकर, गंगु पुजारी अस्लम मुल्ला. पंत गायकवाड, इरफान मुल्ला, आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज गायकवाड यांनी केले तर आभार मेघा बुक्का यांनी मानले.
 
Top