
रुईभर /प्रतिनिधी- माजी मुख्याध्यापक कै. अनिल सारंग सर यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथ आबा कोळगे सोसायटीचे संस्थापक माजी जि. प. सदस्य रामदास कोळगे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी युवकांसाठी खुल्या सायकल स्पर्धा 10 किलोमीटर तर युवती साठी 100 मीटर स्लो सायकल स्पर्धा संपन्न झाल्या.
यावेळी सायकल स्पर्धेचे उद्घाटन रुईभरचे सरपंच दत्तात्रय कस्पटे यांच्या हस्ते तर स्पर्धेला हिरवा झेंडा डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांनी दाखवला.
या सायकल स्पर्धेत 55 स्पर्धकांनी भाग घेतला . यामध्ये 10 किलोमीटर युवकांच्या स्पर्धेत प्रथम - ओंकार हरिचंद्र औचार,द्वितीय - रोहित हनुमंत गव्हाणे, तृतीय - अक्षय रामेश्वर काळे अनुक्रमे आले.
युवती साठी 100 मीटर स्लो सायकल स्पर्धेत एकूण 35 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात प्रथम - प्रज्ञा भाऊराव भोसले, द्वितीय - संध्या नागनाथ जगताप, तृतीय - संजीवनी सुधाकर कोळगे अनुक्रमे आलेल्या आहेत. या सर्व विजयी स्पर्धकांना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी बक्षिसाचे वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी धाराशिव तालुका शिवसेना उपप्रमुख राजनारायण कोळगे, उपसरपंच बालाजी कोळगे, प्रा जयप्रकाश कोळगे, छत्रपती चव्हाण, धनंजय चव्हाण, बाळासाहेब गव्हाणे, हाजीमलंग पठाण, गणपत कस्पटे, गणेश पवार, प्रवीण वडवले, बालाजी वडवले, अभिजीत माने, भागवत कोळगे, दिलदार खोंदे ,बळीराम सिरसाटे, धर्मराज घोडके ,रामभाऊ घोडके ,बापू जाधव, मुख्याध्यापक जी. एम. सुतार, पर्यवेक्षक के. ए. डोंगरे, स्वामी समर्थ कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य कपाळे एस. एस ,शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.