उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुका दि.16 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या असून तदनंतर निर्वाचित सदस्यांमधून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 11 (1) मधील तरतुदीनुसार दि.08 जानेवारी रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडणूका जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये दुपारी 2.00 वाजता घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 45 (2) व तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापती) व पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणुका) नियम 1962 मधील 2 ब नुसार जिल्हा परिषद, उस्मानाबादचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरिता दि.08 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जात महिला साठी आरक्षित आहे. कलम 45 मधील 1 नुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी विशेष सभा बोलविण्याबाबत व या निवडीकरिता पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावयाची तरतूद आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना नियम 2 मधील तरतुदीनुसार हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याची जबाबदारी सोपविली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांना दि.08 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता होणा-या विशेष बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व निर्वाचित सदस्यांना विहीत नमुन्यातील नोटीसांची नियमाप्रमाणे मुदतीच्या आत बजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बैठकीची कार्यक्रमपत्रिका पुढीलप्रमाणे आहे -दि.08 जानेवारी 2020 सकाळी 10 ते 12 पर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे, दुपारी 2 वाजता सभेस सुरुवात करणे, सभा खालीलप्रमाणे पार पडेल. दुपारी 2 ते 2.15 अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्राची तपासणी, नामनिर्देशन पत्राची छाननी. दुपारी 2.15 वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराची नावे वाचून दाखविणे. दुपारी 2.15 ते 2.30 उमेदवारी परत घेणे. दुपारी 2.35 वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवारीची नावे वाचून दाखविणे. दुपारी 2.40 निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे. दुपारी 2.40 ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा निकाल जाहीर करणे.
या कार्यक्रमानुसार प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल. व त्यानंतर लगेच त्याच पध्दतीचा अवलंब करुन उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल. सभेचा इतिवृत्तांत त्याच वेळी पूर्ण करण्यात येईल. तसेच त्याची नोंद जिल्हा परिषदेच्या इतिवृत्त नोंदवहीमध्ये अभिलेखित करण्यात येईल. इतिवृत्ताची प्रमाणित प्रत त्याच दिवशी सायंकाळी शासनास सादर करण्यात येईल.