परंडा/ प्रातनिधी-
दिनांक 22 बुधवार रोजी येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये करियर इन मॅनेजमेंट या विषयावर वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा सावळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ सुयोग अमृतराव, प्रा सचिन बसय्ये,डॉ कृष्णा शिंदे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे व डॉ महेशकुमार माने आदी उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना पदवीनंतर उपलब्ध असणा-या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्याविषयी विद्याथ्र्यांना माहिती मिळावी या अनुषंगाने विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ करण्यात आला. डॉक्टर विक्रम शिंदे यांनी मॅनेजमेंट एज्युकेशन अ न्यू  वर्ल्ड ऑफ पौसीबिलिटी या विषयावरती आपले आपले पावर परीक्षेद्वारे मार्गदर्शन केले दुस-या सत्रामध्ये एमएएच एमबीए-सीईटी डिटेल्स याविषयी डॉक्टर सचिन बसय्ये यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले तर शेवटच्या सत्रामध्ये डॉक्टर अमृतराव यांनी महाविद्यालयीन विद्याथ्र्यांना पदवीनंतर उपलब्ध असणा-या विविध संधी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉक्टर महेशकुमार माने  यांनी केले अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. दिपा सावळे यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉक्टर सचिन चव्हाण यांनी मानले. या चर्चासत्रासाठी प्रा. डॉ. सचिन चव्हान प्रा सचिन साबळे व प्रा काळे संतोष यांनी सहकार्य केले.
 
Top