तुळजापूर/प्रतिनिधी-
सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून सुध्दा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतील ज्यावेळी तरुणांना अभ्यासाबरोबरच प्रायोगिक पध्दतीचे शिक्षण मिळेल.प्रत्येक विषयाचे अध्यापन हे वैज्ञानिक व डोळसपणे होणे आवश्यक आहे.तरुणांनी रोजगार मागण्यापेक्षा इतरांना रोजगार द्यावेत, औद्योगिक दृष्टीचा स्विकार करावा लागेल.प्रयत्नशिल तरुणांना निश्चित यश प्राप्त होईल. सामाजिक शास्त्रातील विषय वैज्ञानिक सत्याशी जोडणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ.मृणालिनि फडणवीस यांनी केले.
 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे सामाजिक शास्त्रे व वाणिज्य शास्त्रातील नविन बदल या विषयावर आधारित द्वितिय एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ.मृणालिनि फडणवीस या बोलत होत्या.यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले. त्यानंतर डॉ. सतिश कदम यांनी तुळजापूरनगरीचे अत्यंत सूक्ष्म पध्दतीने वर्णन केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. मणाळे, प्रा. डॉ. एच. जी. सपकाळ, प्रा. डॉ. एन. बी.काळे, प्रा. डॉ. दैठणठर, प्रा.ए.जी.पोटे, प्रा.बी.जे.कुकडे, प्रा.अण्णासाहेब वसेकर, प्रा. डॉ. रोकडे, प्रा. सोहन कांबळे, प्रा.लक्ष्मण माळी, प्रा.आबासाहेब गायकवाड, प्रा.आशपाक आतार, प्रा.धनंजय लोंढे, प्रा. डॉ. विलास गुंडपाटील, प्रा.सतिश वडगावकर, प्रा.डॉ.मंत्री आर.आडे, प्रा. डॉ.अशोक मर्डे, प्रा. डॉ.राजकुमार गिते, प्रा. विजयसिंह देशमुख, प्रा.जे.बी.क्षीरसागर, ग्रंथपाल दिपक निकाळजे आदींचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम मणेर यांनी सर्व शिक्षक व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सिध्देश्वर सुरवसे यांनी तर आभार प्रा.डॉ.बालाजी गुंड यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी  उपस्थित होते. सदर राष्ट्रीय चर्चासत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

 
Top