प्रतिनिधी-उमरगा/लोहाराउस्मानाबाद जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी दादा चालुक्य यांचे दि.23 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजायच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे.
शुक्रवार दि. 24 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार मूळगावी मुळज (ता. उमरगा जि.उस्मानाबाद) येथे होईल. जि.प.चे अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती अभय भैय्या चालुक्य यांचे ते वडील होत. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.