उस्मानाबाद /प्रतिनिधी-
परंडा शहरातील अण्णा दशरथ खडके यांनी दि. 14 जून ते 14 डिसेंबर या कालावधीत राहत्या घराजवळील महावितरण खांबावरील तारेवर आकडा टाकुन 52,710 रुपयांची 2014 युनिट विजेची चोरी केली. हा प्रकार परंडा येथील महावितरणच्या पथकाला आढळून आला. सहाय्यक अभियंता संजीव सोपान रोकडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुध्द परंडा येथे सोमवारी (दि. 20) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 
Top