उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील शासकीय दुध वितरण केंद्राची एक एकर जागा हस्तातंरीत करून त्या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती  पुतळा बसवून भव्य स्मारक उभे करावे, या मागणीसाठी नगरसेवकांसह नागरिकांच्या वतीने न.प. मुख्याधिका-यांना निवेदन देण्यात आले.
उस्मानाबाद नगर पालिकेने ११ जून २०१८ च्या वार्षिक सभेत शासकीय दुध वितरण संघाची एक एकर जागा हस्तांतरीत करून तेथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यंाचा पुतळा बसविण्याचा ठराव घेतला आहे. त्यानुसार दुध संघाच्या जागेत पुतळा उभ करून भव्य स्मारक उभे करावे, अशी मांगणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर माणिक बनसोडे, गणेश खोचरे, सिध्दार्थ बनसोडे, युवराज नळे, दत्ता पेठे, विद्या एडके, विठाबाई पेठे, शिवाजी गायकवाड, संतोष मोटे, देवानंद एडके, अशोक पेठे आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top