उस्मानाबाद/प्रतिनिधी-
निकृष्ट काम झाल्याची बातमी का छापली म्हणून पत्रकारास मारहाण करणाहृया दोन आरोपींना न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत बसण्याची व प्रत्येकी दिड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोटावली. तसेच या दोन्ही आरोपींनी संबंधित पत्रकारास प्रत्येकी 3 हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी असा आदेशही न्यायालयाने दिला.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, तेर येथील एका पत्रकाराने स्मशानभुमीचे बांधकाम निकृष्ट झाल्याची बातमी 30 मे 2016 रोजी दैनिकात छापली होती. सदर बातमी प्रसिध्द होताच संबंधित कामाचा गुत्तेदार बालाजी श्रीमंत पांढरे यांनी एसएमएस पाठवून सामनाचे वार्ताहर विजय कानडे यांना धमकी दिली. त्यानंतर बालाजी पांढरे यांच्या सांगण्यावरुण त्याचा मावसभाऊ किसन कानडे यांनी तु निकृष्ट कामाची  बातमी  का लावली म्हणुन दुसहृया दिवशी म्हणजेच 31 मे रोजी सकाळी 10 वाजता विजय कानडे यांना मारहाण करण्यात आली. त्यावरून विजय कानाडे यांनी किसन कानाडे व बालाजी पांढरे यांच्या विरूध्द ढोकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारारीवरून दोन्ही आरोपी विरूध्द कलम 324, 323, 504, 506 या 35 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार 30 डिंसेबर रोजी 3 रे न्यायदंडाधिकिरी ख्वाजा कलाल यांनी  सर्व साक्षीदार तपासून किसन कानाडे व बालाजी पांढरे यांना कलम 324, 325, 357 च्या आपराधाकरीता प्रत्येकी 1500 दंड व कोर्ट उठेपर्यंतची न्यायालयात बसण्याची शिक्षा बजावली तसेच दोन्ही आरोपींनी संबंधित पत्रकारास प्रत्येकी 3 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी असा आदेश न्यायमुर्तींनी दिला आहे.

 
Top