तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील भातंब्री ते तिर्थ खुर्द  शेतरस्ता तहसिलदार सौदागर तांदळे यांनी अतिक्रमणमुक्त केला. त्यामुळे  या भागातील शेतक-यांना याचा लाभ होत आहे. तसेच  तिर्थ खुर्द येथील नागोबा मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता सोईचा असल्याने येथील भक्तांची सोय झाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील भांतब्री ते तिर्थ खुर्द शेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. यामुळे  शेतक-यांना जमिन कसणे अवाघड बनले होते. या बाबतीत महसुल स्तरावर शेतरस्ता करण्याचा निकाल लागुन ही  तो रस्ता गेली दोन वर्षा पासुन होत नव्हता अखेर मंगळवार दि.14 रोजी तहसिलदार सौदागर तांदळे यांनी अतिक्रमण करणा-या शेतक-यांना समजुन सांगितले व हा  शेत रस्ता अतिक्रमण मुक्त केला.  हा रस्ता अतिक्रमण मुक्त केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

 
Top