उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भाजपा जिलाध्यक्ष पदासाठी शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी होणारी निवडणुक ज्येष्ठ नेता शिवाजी दादा चालुक्य यांच्या निधनामुळे पुढे ढकलली असून या बाबत लवकरच बैठक होईल. व नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल. जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी ८ ते १० उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपामध्ये सध्या जिलाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस वाढल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यंाचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्याने जिल्हाध्यक्ष पदाची निवडणुक पक्षाच्या ध्येयधोरणानुसार होत आहे. नव्याने होणा-या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सुधीर पाटील, अॅड.अनिल काळे, अॅड.मिलींद पाटील, रामदास कोळगे, अॅड.खंडेराव चौरे हे इच्छुक असून विद्यमान जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांनी आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, चंद्रकांत दादा पाटील, विजयराव पुराणीक हे जो निर्णय घेतील त्या सोबत आम्ही आहोत, असे सांगितले. विशेष म्हणजे कुलकर्णी, काळे गटातील कांही कार्यकत्र्यांच्या मतानुसार दत्ता कुलकर्णी यांचीच   फेर निवड व्हावी, अशी मागणी केल्याचे समजते.पक्षातील ज्येष्ठ नेते अॅड.मिलींद पाटील यांच्या समर्थकांनी अॅड. पाटील यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा संभाळावी, यासाठी जोरदार प्रयत्न चालु केले आहेत.
जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले सुधीर पाटील यांनीही आपण जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलो तरी पार्टी ने संधी दिल्यास नव्या जोमाने आपण काम करू, असे सांगितले. एकंदर उस्मानाबाद भाजपा जिल्हाध्यक्ष पदासाठी ८ ते १० उमेदवार इच्छुक असले तरी आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, विजयराव पुराणीक कोणाला कौल देतील यावर जिल्हाध्यक्षाची नियुक्ती ठरणार आहे.

 
Top