उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 या वर्षी  प्रथमच श्री तुळजाभवानी जिल्हा क्रक्रीडा संकुलावर रविवारी, दि.26 जानेवारीस मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते पार पडणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, येथील ध्वजारोहण जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता होणार आहे. आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारत  येथील ध्वजारोहण अपर जिल्हाधिकारी  शिरीष यादव  यांच्या हस्ते सकाळी 8.20 वाजता होणार आहे.
ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे, म्हणून जिल्हा मुख्यालयातील इतर सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी त्यांचे ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 8.30 पूर्वी किंवा सकाळी 10 वाजल्यानंतर आयोजित करावेत. संबंधित उपविभागीय अधिकारी  व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय कार्यालय व तालुका मुख्यालय येथे ध्वजारोहण समारंभाच्या शासकीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.  सर्व नागरिकांनी अधिकारी/कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण समारंभास राष्ट्रीय पोषाख परिधान करुन नियोजित वेळेच्या 20 मिनीटे अगोदर ध्वजारोहणाच्या स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top