उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अवकाळी पाऊस आणि दुष्काळाचा तडाखा बसलेल्या सोलापूर जिल्हयातील शेतक-यांसमोर फळबागेचा एक पर्याय म्हणून समोर आला आहे.कुर्डूवाडी (ता.माढा) येथील प्रगतीशील शेतकरी विलासचंद संचेती व विकास संचेती या बंधूनी दहा एकर मध्यम प्रतीच्या जमीनीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ठिंबकद्वारे पाण्याचे नियोजन केले. त्यामुळे त्यांना या दहा एकर क्षेत्रातील लिंबू (कागदी लिंबू) च्या फळबागेतून दरवर्षी सुमारे २० लाखांहून अधिकचे उत्पन्न मिळत आहे. यंदा कागदी लिंबाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसतानाही त्यांनी एकरी दोन लाखांहून अधिकचे उत्पन्न घेतले आहे. खेडयामध््ये शेती करणा-या जैन शेतक-यांसाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे.
कुर्डुवाडी परिसरातील मध्यम प्रतीच्या जमिनीवर उत्पादन झालेल्या कागदी लिंबूने वाशी (मुंबई), कोल्हापूर येथील बाजारपेठे जिंगली आहे. मागील तीन-चार वर्षापासून ते या दहा एकर क्षेत्रात २० लाखाहून अधिकचे उत्पादन घेत आहेत. २०१७ पासून त्यांनी आता लिंबाच्या रोंपाची नर्सरी सुरू केली असून, त्यातूनही त्यांना गतवर्षी सुमारे दोन लाखांचे आणि यंदा आतापर्यंत १.५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. संचेती बंधूच्या कुर्डुवाडी येथील या दहा एकर फळबागेत लिंबाची हजारो झाडे आहेत. यातील ७०० हून अधिक झाडांना गेल्या चार-पाच वर्षापासून भरघोस फळ लागत असून, उर्वरित झाडांना पुढील वर्षापासून चांगली फळधारणा होईल असा त्यांना विश्वास वाटतो. सेंद्रिय व गांडूळ खतचा वापर करीत त्यांनीही फळबाग जोपासली आहे. संचेती बंधूकडे एकुण ३२ एकर जमीन आहे. त्यापैक्ी १० एकर जमिनीवर लिंबाची फळबाग आहे, तर उर्वरित क्षेत्रात ते पारंपरिक पिके घेतात. त्यांच्याकडे या शेतात दोन विहिरी असून तेथील पाण््याचे त्यांनी सिंचन योजनेद्वारे नियोजन केलेले आहे. मागील पाच-सहा वर्षे दुष्काळाने फटका दिला असतानाही त्यांना नशिबाने साथ दिली व त्यांनी लिंबाचे जोरदार उत्पादन घेतले. त्यांच्याकडील या कागदी लिंबाला कोल्हापूरसह वाशी (मुंबई) येथे चांगला दर मिळत आहे. सध्या सोलापूरहून त्यांच्याकडील या उत्पादनाला मागणी वाढली आहे. निसर्ग साथ देत नसला किंवा पाऊस कमी जास्त झाला तरी शेतक-यांनी घाबरण्याची गरज नाही. पाणी कमी असतानाही केवळ जलव्यवस्थापना द्वारे भरघोस उत्पादन काढणे शक्य आहे. मात्र यासाठी श्रम करण्याची जिद्द व सकारात्मक विचारसणी पाहिजे. तरच भरघोस उत्पन्न घेणे सहज शक्य आहे, असे विलासचंद संचेती  यांचे मत आहे. या संचेती बंधूचे कुर्डूवाडी येथे रेडिमेड कापड व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. तेथील सर्व व्यापर सांभाळत विलासचंद संचेती हे जातीने शेतीचा कारभार सांभाळतात. दिवसातून बारा तास ते शेतात श्रम करतात.त्यांना याकामी त्यांची कुटूंबीय मंडळीही साथ देतात. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व अथक मेहनत, नवनवीन प्रयोग, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर याच्या बळावर सध्या एक ते दहा एकर लिंबू बागेतून दरवर्षी २० लाखांहून अधिकचे उत्पादन घेताहेत. सध्या कुर्डूवाडी परिसरातील अनेक युवकांना व शेत-यांना ते लिंबू फळबागेचे मोफत मार्गदर्शनही करताहेत. आता या परिसराला लिबू गु्रप या नावाने ओळखले जावू लागले आहेत. विलासचंद संचेती यांचे कार्य इतर शेतक-यांना प्रेरणा देणारे आहे.
 
Top