उस्मानाबाद/प्रतिनिधी-
खरीफ हंगामातील सोयाबीनचे नुकसान होऊनही विम्यातुन वगळल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त पदाधिका-यांनी  कृषी उपसंचालक कार्यालयात खुच्र्यांची  तोडफोड केली.
 या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह कळंब तालुकाप्रमुख विष्णूदास काळे, धनु चोंदे, कमलाकर पवार, चंद्रकांत समुद्रे, माणिक घाटुळे, गुरू भोजने, राजेंद्र हाके, प्रदीप जगदाळे यांनी उपसंचालक एस. पी. जाधव यांच्या कार्यालयात पोहचले . यावेळी त्यांना जाधव यांनी या संदर्भात कृषी विभागाने अहवाल पाठवले आहेत, आता आमच्या हातात काही नाह  असे सांगितले. तसेच अधीक्षकांचा चार्जही कोणालाच दिला नसल्याचे सांगितले. चार्ज आल्यावर अधिक माहिती देऊ, तुम्ही उद्या या, असे म्हणताच कार्यकर्ते संतापले.  व   शेतक-यांना विमा मिळालाच पाहिजे  अशी घोषणाबाजी करत त्यांनी खुच्र्यांची तोडफोड केली.
 
Top