तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील वासुदेव गल्ली भागातील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास बुधवार दि22रोजी मोठ्या उत्साहात आरंभ झाला. बुधवारी सकाळी श्री तुळजाभवानी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. नंतर ग्रंथ, विना, कलशाचे पुजन नगरसेविका भारतीताई नारायणराजे गवळी, माजी नगराध्यक्षा जयश्री ताई, विजय कंदले नगरसेविका रेशमाताई गंगणे यांच्या हस्ते करण्यात येवुन या सोहळ्यास आरंभ झाला.
प्रतिदिनी काकडा, ज्ञानेश्वरी, पारायण, गाथाभजन, हरिपाट, हरि किर्तन, हरिजागर, प्रवचन, भजन, किर्तन अदि कार्यक्रम होणार आहे. याची सांगता मंगळवार दि.28 रोजी हभप दादामहाराज सोनटक्के यांच्या काल्याच्या किर्तनानंतर काल्याचा महाप्रसाद वाटप होऊन होणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सतिष बांडे, वैभव कंदले, अदिनाथ महाराज लोखंडे, नगरसेवक विजय कंदले, आनंद कंदले, अरुण कंदले, दत्ता माने, उत्तम माळी, देवेंद्र हंगरगेकर, नंदकुमार गाडे सह वासुदेव गल्लीतील  मंडळी परिश्रम घेत आहेत.
 
Top