लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक क्रक्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन  22 जानेवारी  रोजी महाविद्यालया‘या प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यां‘या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्रीडा विभागप्रमुख प्रा.प्रशांत काळे, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा.रामचंद्र खुणे, प्रा.विष्णुदास कलमे, प्रा.ज्ञानदेव शिंदे, प्रा. राजेश आष्टेकर, प्रा. सुनिल बहिरे, प्रा. लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रा. विजय उंबरे, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. मुकुंद रसाळ, प्रा. दगडू साठे, प्रा. उद्धव सोमवंशी, प्रा. बालाजी सूर्यवंशी, प्रा. विद्यासागर बुवा यां‘यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top