उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथे संपन्न होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याविविध कार्यक्रमाची माहिती  उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात  पोहोचवण्यासाठी शुक्रवार ३ जानेवारी रोजी उमरगा तालुक्यातील अचलबेट येथून साहित्य ज्योतीस प्रारंभ झाला.
ही साहित्य ज्योत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाऊन साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवून संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार  आहे. या साहित्य ज्योत यात्रेच्या  शुभारंभ प्रसंगी स्वागत अध्यक्ष नितीन तावडे कार्यवाह रवींद्र केसकर तसेच संयोजन समितीचे अग्निवेश शिंदे,  उमेश राजे निंबाळकर,  प्रशांत पाटील यांच्यासह चंद्रसेन देशमुख,  दिलीप पाठक नारीकर, बालाजी तांबे, निंबाळकर सर,  आणि इतर मान्यवर उपस्थित होते .
साहित्य ज्योतीच्या शुभारंभ नंतर ही साहित्य ज्योत उमरगा शहरातील विद्यालयामधून महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनींना साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी गेली तसेच उमरगा शहरात  साहित्य समेलनाची माहिती देण्यासाठी रॅली,पदयात्रा काढण्यात आली. यावेळी उमरगा शहरात शिवसेना युवक नेते किरण गायकवाड यांनी ५१ हजार रूपयाची देणगी संमेलनास सुपूर्द केली.
 उमरगा शहरातील अनेक नागरिक महिला, पुरुष, साहित्यिक तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर ही साहित्य ज्योत यात्रा लोहारा मार्गे तुळजापूरकडे मार्गस्थ झाली.

 
Top