पहिल्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता  
तुळजापूर/प्रतिनिधी-
  कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या जानेवारी (पौष) महिन्यातील  शाकंभरी नवरात्र महोत्सवास शुक्रवार दि.3 रोजी दुर्गाष्टमी दिवसी दुपारी 12 वाजता श्रीगणेश ओवरीत  विधीवत संभळाचा कडकडाटात  शाकंभरी देवी प्रतिमे समोर घटस्थापना संपन्न होऊन आरंभ  झाला. शाकंभरी नवराञोत्सव प्रथम दिनी देवीदर्शनार्थ भाविकांनी दिवासभर मोठी गर्दी केली होती.
शुक्रवार दि.2 रोजी पहाटे चरणतिर्थ करण्यात आले. त्यांनतर देविची निद्रस्त मुर्ती पहाटे साडेतीन वाजता चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापीत करून देवीस पंचामृत दही, दुध, पंचामृत अभिषेकपुजा संपन्न करून शुध्द स्नान घालण्यात आले. त्यानंतर  देवीस वस्ञोलंकार घालण्यात येवुन धुपारती झाली. यानंतर पुनश्च सकाळी सहा वाजता देविजीस भाविकांचे दही, दुध, पंचामृत, अभिषेक पुजा संपन्न झाल्यानंतर धुपारती करण्यात आली.यावेळी श्रीगणेश ओवरीत शाकंभरी देवी समोर मंहत तुकोजीबुवा, हमरोजी बुवा, मंहत वाकोजी बुवा, यजमान संजय विष्णूपंत जेवळीकर, पाळीचे भोपे पुजारी विनोद सुनिल सोंज, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके, उपाध्यक्ष मंडळ अध्यक्ष अनंत कोंडी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. नंतर बृम्हवृदांना अनुष्ठानसाठी वर्णी देण्यात आली. त्यानंतर शाकंभरी देविची मंगलआरती होऊन शाकंभरी नवराञोत्सवास आरंभ झाला. सांयकाळचे देविस दही, दुध, पंचामृत अभिषेक पुजा संपल्यानंतर धुपारती केल्यानंतर  राञी देवी प्रागणात छबिना निघाल्यानंतर शाकंभरी नवराञोत्सवातील पहिल्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली.
लहान दसरा  
तिर्थक्षेञ तुळजापूर ला शाकंभरी नवराञोत्सवास छोटा दसरा म्हणून साजरा करतात. या नवराञोत्सवात देवीस स्थानिक पुजारीवृंद देविस कुलधर्म कुलाचार करतात या नवराञोत्सव काळात पुजारीवृंद मोठ्या संखेने देवीस सिंहासन पुजा करतात .या नवराञोत्सवात पुजारीवर्ग नऊ दिवस उपवास करतात.
 देवी सिंहासनावर अधिष्ठीत !
शुक्रवार दि.3 रोजी प्रथम पहाटे 2 वा. मंदीर उघडले गेले नंतर चरणतिर्थ करण्यात आली. त्यानंतर  देवी मुर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापणा 3.15 ते 3.30 या कालावधीत केल्यानंतर देवीस  पंचामृत स्नान शुध्द स्नान करुन आरती  करण्यात आली . सहा वाजल्यानंतर नित्योपचारपुजा पुनश्च आरंभ झाली.

 
Top