उस्मानाबाद येथे ९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार असे समजताच माझे मन जवळ जवळ ३५. ४० वर्षे मध्ये गेले . तसे उस्मानाबाद येथे साहित्य परंपरा फार पूर्वी पासून म्हणजे संत गोरोबा काका यांचे काळापासून आहे . त्यांचे काळात तेर ( तगर) येथे साहित्य संमेलन झाल्याच्या  माहिती कुठे तरी वाचनात आली होती . पण गोरोबा काका साहित्यिक तर निश्चितच होते . त्यांचे अभंग आजही उपलब्ध आहेत . उस्मानाबाद येथे वाचन चळवळ ही फार मोठी होती . येथील नगर वाचनालयाला फार मोठी परंपरा आहे . त्याच उस्मानाबाद मध्ये एक जिल्हा साहित्य संमेलन होवून गेले . त्याची कोठे फारशी नोंद नाही , किंवा साहित्य संमेलनाचे  विषयी लीहताना त्याचा कोठे उल्लेख आला नाही . 
        उस्मानाबाद येथे १९७८ ते १९८२ पर्यंत एक विद्यार्थी चळवळ होती त्याचे नाव समता मंच . साधारण १५/२० वाचन वेडे, समाज वेडे,मी , प्रसाद आत्नुरकर,देविदास वडगावकर ,यशपाल सरवदे , मंगल वैद्य , क्षमा देवडीकर , सुनीता बागल , उषा नाईक , सुलभा शिनगारे , सुनील बडूर्कर , उमेश कुलकर्णी ,वगैरे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण मुले मुली एकत्र येवुन ही चळवळ चालवत . मग आठवड्यातून एक दिवस विविध सामाजिक विषयावर किंवा नुकत्याच वाचलेल्या पुस्तकं विषयी चर्चा आसत. (आता ही सगळी मंडळी मोठं मोठ्या पदावर कार्यरत आहेत   पण प्रत्येकाचे मनात समता मंच बद्दल एक विशेष कोपरा आहे )
         याच चर्चा चर्चा मध्ये आपण एक छोटेसे साहित्य संमेलन घ्यावे ही कल्पना या ग्रुप ला सुचली. पहिल्यांदा एक छोटेखानी कॉलेज स्तरावर एकदिवसीय समेलन घ्यावे. त्याला आमचे सर्वांचे लाडके सर अे. डी.जाधव यांना अध्यक्ष करावे , आणि सगळ्या कॉलेज मधील मुलांना सहभागी करून घ्यावे हा विचार ठरला . कारण यात खर्च काहीच न्हावता. आणि खर्च करण्याची कोणाचीच ऐपत न्हावती. 
         सहज एक दिवशी हा विषय ग्रुप चे आधारस्तंभ , मार्गदर्शक आणि प्रतिष्ठित पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांचे कानावर टाकली. त्यांना तो विषय एव्हढा भावला की ते लागलीच म्हणाले संमेलनाध्यक्ष बोलावण्याची जबाबदारी माझी . आपण जरा मोठ्या प्रमाणावर करू. 
       मोठ्याप्रमाणावर करू या त्यांच्या वाक्याबराबर आमच्या पोटात गोळा. कारण खर्च . कोण आणि कसा करणार. आम्ही आडचान सांगितली . म्हणल दादा ( आम्ही त्यांना दादा म्हणायचो ) हे कसं . ते म्हणाले बघू . 
    आणि हा विषय तिथेच थांबला . आमचं रूटीन चर्चा , सामजिक चळवळ चालूच . कधीतरी संमेलनाचा विषय निघायचा. पण विषयच भारत दादाचे झोळीत टाकला आसल्याने आम्ही गप्प. 
      एक दिवस मी कॉलेज ला जात असताना ( त्याच वाटेवर ते राहायचे ) त्यांनी मला बोलावून घेवून सांगितले की या आठवड्याची तुमची बैठक माझ्या गच्चीवर घेवू . सर्वांना निरोप दे . मी म्हटलं ठीक . विशेष काही न्हावते . ते आधून मधून आम्हाला बोलवायचे . 
     आम्ही जमलो . आणि बैठकीच्या सुरुवातीलाच दादांनी आम्हाला धक्का दिला . म्हटले आपले संमेलनाचे अध्यक्ष ठरले , पाहुणे ही ठरले.  ग. वा.बेहरे अध्यक्ष, आनंद यादव प्रमुख पाहुणे बा.भ.पाटील कथाकथन करतील , आणि वी. ष.पारगावकर बोलतील. आता कसे करायचे बोला. एवढे प्रतिथयश साहित्यिक येणार , आपल्या बरोबर राहणार , आपल्याला त्यांचा सहवास लाभणार , कारण हे सारे आम्हाला त्यांच्या साहित्यातून फार दिवसापासून भेटत होते पण प्रत्यक्ष ते सुध्धा विश्राम बेडेकर सारखा माणूस बापरे.  मोठं काहीतरी करायला मिळतेय म्हणून आनंद झाला . पण करायचे कसे हा प्रश्न होताच . म्हणून कोणतीच लागलीच प्रतिक्रिया उमटली नाही.  मग तेच म्हणाले आपण उस्मानाबाद जिल्हा साहित्य संमेलन करू . पैसे कसे उभे करायचे ते पाहू . 
आम्ही सुन्न . आनंद आणि भीती समिश्र. 
     मग आमच्या चर्चा वर चर्चा चालू झाल्या . एवढे मोठे लोक येणार तर मग त्यांची व्यवस्था कशी ? त्यांना कुठे ठेवायचे ? काय काय लागेल , त्यांचं मानधन काय ? किती खर्च येईल ? सगळं नवीनच .पण हा प्रश्न फार दिवस त्रास दायक नाही ठरला. भारत दादांनी हा प्रश्न सोडवला. 
        १९७८ साल आणि उस्मानाबाद , विचार करा काय आसेल उस्मानाबाद . कार्यक्रम करायला जागा नाही . मंडप डेकोरेट नाही , माईक नाही , फोटोग्राफर नाही . त्यातूनही कार्यक्रम होत , आणि आजच्या पेक्षा देखणे आणि दर्जेदार होत . कारण समाज फार सहकार्य करायचा , प्रत्येकजण आपापल्या परीने सहकार्य करायचा . 
 सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जाधव सराना ही कल्पना दिली . त्यांनी ती उचलून धरली . म्हटलं चला कॉलेज चा absenti चा प्रश्न मिटला. आता प्राचार्य . त्यावेळी विजया पाटील मॅडम प्राचार्या होत्या अगदी कडक शिस्तीच्या. त्यांना जाधव सरांचे माध्यमातून भेटलो . कल्पना दिली . त्या तर जागेवर उडाल्याच , विश्राम बेडेकर  ? आनंद यादव ? छ , त्या परत परत आम्हाला नावे विचारात होत्या .त्यांना फार आनंद झाला. त्यांनी पूर्ण सहकार्याची हमी दिली . अट एकच त्याची येणाऱ्या सर्व साहित्यिकांची ओळख करून द्यायची . आम्ही ती एक मुखाने मान्य केली . 
  सगळी फाशी आमच्या बाजूने पडत असल्याचे पाहून आमचा विस्वास वाढला आणि आपण हे करू शकतो याची खात्री पटली . 
       आता विषय होता जागेचा , उस्मानाबाद त्यावेळी मोकळ्या जागा भरपूर होत्या पण त्यावर मंडप , खाली गादी ,सतरंजी , माईक ,स्पीकर एवढं सगळ एका कडे मिळणे मुश्कील .आणि खर्चिक . आणि हॉल तर नही के बराबर. मग सुचले की multipurpose हायस्कूल ची नवी इमारत आहे आणि त्यात हॉल आहे . मग एकजण गुपचूप जावून हॉल बघून आला. बऱ्या पैकी आसा रिपोर्ट आला. मग त्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले . त्यावेळी त्या शाळेचे मुख्याध्यापक होते श्री. घाटे . उमदा माणूस , आणि त्यांचे सहकारी होते गिरिजेश शास्त्री सर , ते तर साहित्यिक. मग आम्ही घाटे सर ला भेटली , त्यांना कार्यक्रम सांगितला . त्यानी असमर्थता व्यक्त केली. कारण खाजगी कामाला होल देत नाहीत ,शिक्षण आधिकरी यांची परवानगी लागते.  असे त्यांनी सांगितले . आली का पंचायत. पण यावेळी गिरिजेश शास्त्री सर मदतीला धावून आले . त्यांनी शिक्षण अधिकार्यांची परवानगी मिळवून दिली. आणि जागा ठरली. 
               जागा ठर ली , तारीख ठरली , समेलांध्यक्ष , प्रमुख पाहुणे ठरले . आता मुख्य बाजू , पैसे. 
        आमच्या बैठका भारत दादा बरोबर चालूच होत्या . एकीकडे निमंत्रित लोकांची यादी काढणे चालू होते . दादा चे घरून फोन करणे , निमंत्रण देणे , वगैरे कामे चालू होती . पण हे सगळे बिन पैशानेच . 
मुख्य कार्यक्रम पैसे लागणारच . हार तुरे माइक खुर्च्या , सतरंज्या , जिल्ह्यातून येणाऱ्या निमंत्रित लोकांची राहण्याची व्यवस्था. त्यांचे जेवण , संमेलन उद्घाटन सोहळा , सगळे पैशाचे विषय . आत्ता मात्र आमची धडपड दुरून पाहणारी काही मित्र मंडळी जोडत होती , मदत करत होती . आमचे प्राध्यापक मंडळी काही आर्थिक हातभार लावण्यासाठी तयार झाली . पण मोठा हातभार आर्थाताच भारत दादा आणि कै. व्यंकटेश तथा आबा हांबी रे यांनी लावला .  
     आम्ही पण आमच्या घरी सांगून जमतील तेवढं हातभार लावला. कोणी गहू दिले , कोणी तांदूळ , कोणी साखर दिली कोणी डाळ . शहरातील मारवाडी मित्रांनी किराणा दीला. हा सगळा शिधा गोळा करणारी एक समिती, पाहुण्यांची देखभाल करणारी एक समिती , स्वागत समिती , भोजन समिती , कार्यक्रम रूपरेषा ठरवणारी समिती ,निमंत्रित स्वागत समिती . अशा समित्यांचे माध्यमातून काम चालू होते , आम्हाला तर काय करू आणि काय नाही असे झाले होते . उत्साहाला नुसते भरते आले होते . टीम वर्क जुळून आले होते . बहुतेक सगळी कामे कुणाचे न कुणाचे घरी बसून  हसत खेळत थट्टा मस्करी करत करीत असू. 
        पाहता पाहता संमेलन दिवस उजाडला . पाहुणे दादांनी स्वतः सोलापूर येथे जावून घेवून आले. शासकीय विश्रामगृह हे त्यावेळचे उस्मानाबादचे फाइव स्टार तेथे त्यांची व्यवस्था करण्यात आली . समता मंच मध्ये अध्यक्ष या विषयाला फाटा असल्याने सगळेच अध्यक्ष आणि सगळेच कार्यकर्ते असे होते. त्यामुळे आमच्या पैकी प्रसाद आत्नुरकर यांना पाहुण्यांचे स्वागत करण्याची व त्यांची समलेस्थळी आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती . मी स्वतः स्टेज ची जबाबदारी , मंगल वैद्य ( कठारे ) यांना माझ्या बरोबरच निवेदनाची , क्षमा देवडीकर , सुनीता बागल , उषा नाईक या मुलींना भोजन व्यवस्थापन जबाबदारी देण्यात आली होती . उमेश कुलकर्णी , रमेश तळवलकर आणि गजानन देशपांडे यांना सभागृह जबाबदारी , यशपाल सरवदे , देविदास वडगावकर आणि श्रीपाद टेकाळे स्वागत समिती आणि बरेच काही कामे करीत होती . सगळी जण आगदी चोख जबाबदारी पार पाडत होती . 
       विश्राम बेडेकर , आनंद यादव यांना ज्यावेळी आमचे बद्दल सांगितले तेंव्हा त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले . पोरांनी घडवून आणलेले संमेलन असे त्यांनी आपल्या उद्घटनात मुद्दाम कौतुक उद्गार काढले. त्यांच्या भाषणात त्यांनी ग्रामीण भागातील ढासळत  चाललेली वाचन संस्कृती याबद्दल भीती व्यक्त केली . आनंद यादव यांचेही प्रमुख पाहुणे म्हणून सम्योचीत विचार मांडले . त्यानं नंतर बा भ पाटील यांचे अस्सल गावरान कथाकथन झाले . आणि कार्यक्रम संपला . 
       जिल्ह्यातून आलेल्या मंडळींची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण संमेलनाला आभुत्पूर्व प्रतिसाद मिळाल्या मुळे व्यवस्था तोकडी पडण्याची शक्यता होती.मग काय , मंडळी लागली स्वयंपाकाला, मंगल वैद्य श्री टेकाळे , क्षमा देवडीकर यांनी पोळपाट लाटणं हातात घेवून कामाला सुरुवात. या लाट तायत्त आणि टेकाळे साहेब भाजतायात. सुनीता बागल उषा नाईक भाजी चिरून घेतायत आणि यशपाल सरवदे चुलीला लाकड घालतात असे दृश्य आता दुर्मीळ.  तिथेच जेवण्याच्या पंगती मांडण्यात आल्या .  याच पंगतीत मांडीला मांडी लावून विश्राम बेडेकर , आनंद यादव , बा . भ. पाटील आदी दिग्गज मंडळी बसलेली पाहून जील्यातून आलेली साहित्य प्रेमी मंडळीला आगदी भरून आले . त्या पंगतीत जेवायला वाढायला आम्ही होती . स्रुजनंची मांदियाळी बघून आम्हालाही हुरूप आला होता . आणि गहिवरून आले होते . कार्यक्रमाला घरची मंडळी आली होती , पाहुण्या कडून आमचे होणारे कौतुक बघून त्यांनाही पोरग घरात नसते म्हणजे वाया गेलं नाही आसी खात्री पटली . 
    दुसऱ्या दिवशी सकाळी प्रा. जनार्दन वाघमारे , बा. भ. पाटील , वी.श. पारगावकर यांची कथाकथन आणि काव्य वाचन झाले . आणि समारोप विश्राम बेडेकर यांनी केला. 
  आमचा एक ग्रुप काढण्याची विनंती त्यांनी मान्य केली . आणि आम्हाला भरपूर वाचा , वाचाल तर वाचाल आसा आशीर्वाद देवून मंडळी रवाना झाली . 
      त्यांना निरोप देवून आम्ही हॉल वर आलो तर एकदम रिकाम रिकाम वाटायला लागलं . गेली दोन आडीच महिने राबून केलेला कार्यक्रम आणि मिळालेला आशीर्वाद थकवा घालवून गेला होता . त्यांनी दिलेला आशीर्वाद आजही सगळ्या समता मंच मंडळी पाशी आहे . सगळी मंडळी आज  आप आपल्या ठिकाणी उत्कृष्ट व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन जगत आप आपल्या विचारांशी सुसंगत सामाजिक कामात आहे . वाचत आहे . 
     आज ४० , ४१ वर्षांनी तो प्रसंग जसाचे तसा थोड्याफार फरकाने उभा राहिला. तो हिंदोळा ९३ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमित्ताने घेवू शकलो . 
   आज नितीन तावडे , रवींद्र केसकर , इंगळे , अत्रे सर , अग्निवेश शिंदे यांची धडपड पाहताना मला समता मंच च्या सर्व मंडळींची आठवण येतेय . अर्थात त्यांनाही हीच भावना असणार आहे. उस्मानाबाद सारख्या ठिकाणी साहित्य संमेलन हा सुवर्ण कांचन योग . येथे येणाऱ्या सर्व साहित्यिकांचे आणि वाचकांचे हार्दिक स्वागत . 
       ऍड. राजेंद्र धाराशिव कर . उस्मानाबाद.
 
Top