कळंब/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय  महामंडळ सभा रविवार दि.19 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथे होणार आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यानी दिली आहे .
कोल्हापुर येथिल गणेश लाँन्स येथे होणा-या या राज्यस्तरीय महामंडळ सभेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व या महामंडळ सभेस प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ ,शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड ,गृहराज्य मंत्री सतेज पाटील,नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे,आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तर स्वागताध्यक्ष शिक्षक संघाचे नेते  संभाजीराव थोरात हे उपस्थित रहाणार आहेत.
या राज्यस्तरीय महामंडळ सभेत राज्यातील शिक्षण , विद्यार्थी व शिक्षकांचे महत्वाचे प्रश्न मांडण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने 1 नोव्हेंबर 20005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी ,नगरपालीका व महानगर पालीका शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी राज्य शासनाने 100टक्के अनुदान द्यावे , शिक्षकांच्या बदली धोरणात अवश्यक ते बदल करुन सर्वसमावेशक धोरण तयार करावे अनेक प्रश्नांची उकल या महामंडळ सभेत करण्यात येणार आहे . तरी राज्याती शिक्षकांनी या महामंडळ सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,कार्याध्यक्ष अंबादास वाजे,सरचिटणीस आप्पासाहेब कु,  संपर्क प्रमुख मोहनमामा भोसले ,एन.वाय.पाटील, विनोद राऊत, कोषाध्यक्ष जनार्धन निऊंगरे, महीला आघाडी प्रमुख अनुराधा तकटे यांनी केले आहे.
 
Top