तुळजापूर/ प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सध्या खाजगी वाहन तळांचा सुळसुळाट वाढला असुन या वाहन तळात  भाविकांच्या वाहन सुरक्षेतचा प्रश्र भेडसावत आहे. येथीयल तीन खाजगी वाहानतळांना नगरपरिषद ने अटी वा शर्ती घालुन परवानगी दिली आहे. शहरात एक अनाधिकृत खाजगी वाहनतळ होते यावर नगरपरिषद ने दंडात्मक कारवाई केली आहे.
यावेळी मुख्याधिकारी अशिष लोकरे यांनी सांगितले की,  अटी शर्तीचे भंग करणा-या चालकावर  कारवाई करणार करण्यात  येणार आहे. आमची कर्मचारी अचानक वाहनतळांना भेटी देणार आहेत व कुणी वाहनतळांचा नावाखाली लुबाडणुक करीत असेल त्यांची तक्रार प्राप्त होताच नगरपरिषद त्यांचावर तत्काळ कारवाई करणार आहे, असे सांगितले.

 
Top