उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शेतक-यांना पीकविमा द्यावा या मागणीसाठी कृषी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करून तोडफोड केल्याची घटना सोमवारी उस्मानाबाद येथे घडली होती. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह ८ जणाविरूध्द आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात कृषी उपसंचालक संजय जाधव यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, विष्णुदास काळे, धनु पेंदे, कमलाकर पवार, चंद्रकांत समुद्रे, माणिक घाटुळे, गुरू भोजने, राजेंद्र हाके यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top