प्रतिनिधी-उमरगा/लोहारा
मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न, समस्या आमदारांसमोर मांडून त्याचा पाठपुरावा करणे व मतदारसंघाच्या विकासाला गती देणे यासाठी युनिसेफ च्या सहकार्याने मुंबई येथील स्वयंसेवी संस्था संपर्क आमदार संवाद मंचची स्थापना केली आहे. संवाद मंचातील सदस्यांनी उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची  भेट घेऊन मतदारसंघाबाबत निवेदन सादर केले.
संस्थेच्या मृणालिनी जोग, लता परब, हेमंत कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा येथे बैठक झाली. या बैठकीत आमदार संवाद मंच ची स्थापना करण्यात आली.  यावेळी आमदार संवाद मंच चे सदस्य डॉ. उदय मोरे, बाबा जाफरी, अमोल पाटील, समन्वयक गिरीश भगत, सदानंद शिवदे उपस्थित होते. 
 
Top