लोहारा/प्रतिनिधी  
लोहारा शहरात व तालुक्यातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
न.प.कार्यालय
लोहारा शहरातील नगरपंचायत कार्यालयात  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई दिपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, दिपक मुळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेविका जयश्रीताई कांबळे, नगरसेविका सौ.सुनिता विजयकुमार ढगे, नगरसेवक बाळासाहेब कोरे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, पं.स.सदस्य वामन डावरे, नगरसेवक आरीफ खानापुरे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, ताहेर पठाण, मतीन शेख, महमद हिप्परगे, अजिमबी शेख, नवनाथ लोहार, पप्पु मुळे, गणेश काडगावे, उमाकांत सगट, कमलाकर सिरसाट, नवेद सय्यद, लक्ष्मन माने, अदि उपस्थित होते.
माळी कॉम्पलेक्स
  लोहारा शहरातील माळी कॉम्पलेक्स येथे महात्मा फुले युवा मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन माजी जि.प.सदस्या सौ.मिरा अविनाश माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयनोद्दीन सवार, सुग्रीव क्षिरसागर, अविनाश माळी, राजु स्वामी, राम क्षीरसागर, अशोक माळी, प्रा.डि.एन.कोटरंगे, संजय काटे, सोनाली काटे, किरण चिचोले, कु.आराध्या फुलसुंदर, नगरसेवक श्रीनिवास माळी, अमोल माळी, सोमनाथ भोजने, राजेंद्र क्षिरसागर, वसंत क्षिरसागार, सोमनाथ माळी, ज्ञानेश्वर क्षिरसागर, संतोष क्षिरसागर, नरहरी क्षीरसागर, गणेश क्षिरसागार, अशोक क्षिरसागार, विष्णु क्षिरसागार, शंकर माळी, संतोष माळी, दत्ता माळी, अशोक काटे, शुभम फुलसुंदर, बंटी माळी, मनिषा फुलसुंदर, प्रणिता क्षीरसागर, भाग्यश्री काटे, गितांजली क्षिरसागर, मंगल माळी, निता क्षीरसागर, आर्या फुलसुंदर, आदिती फुलसुंदर, वैष्णवी क्षिरसागार यांच्यासह नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि.प.प्रा. शाळा मोघा खुर्द
लोहारा तालुक्यातील जि.प.प्रा. शाळा मोघा खुर्द येथे ज्ञानाई, क्रक्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती बालीका दिन उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन धनराज भोंडवे, सहशिक्षिका उषा बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या हस्ते सहशिक्षीका उषा बर्डे, अंगणवाडी शिक्षिका कालींदा मत्ते, अंगणवाडी सेविका गुंडूताई सुरवसे यांच्या कार्याचा गौरव म्हणुन सत्कार केला. यानंतर सावित्रीमाई फुले प्रतिमेचे रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना सावित्रीमाई फुले हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर देशातील, महाराष्ट्रातील प्रतिभाशाली महिला तसेच उस्मानाबाद जिल्हाधिकारी मा. दिपा मुधोळ मुंडे यांच्या कार्याची माहिती व्हिडीओ स्वरूपात दाखवण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण भोंडवे, सदस्या मनिषा गोरे, दिपाली भोंडवे, आश्विनी बाबळे, अनिता बाबळे, गिरी महाराज, गोवर्धन मत्ते, हमीद मुजावर, रईसा मुजावर यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय
 नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे क्रक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती यु.व्हि. पाटील होत्या. तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणुन जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष श्रीमती रंजनाताई हासुरे, माजी नगराध्यक्षा पोर्णिमाताई जगदिश लांडगे, वाशी  तालुकाध्यक्ष आशिष पाटील, आदी उपस्थित हेाते.होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी  मुलींचाही विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुलोचना रसाल मॅडम यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य पाटील मॅडम यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.व्ही.धनवडे यांनी केले तर आभार प्रा. एस.डी. शिंदे यांनी मानले. यावेळी शाळा - महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त " बालिका दिन " म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, संचालिका सविता जाधव, प्रणिता जवादे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गोरे यांनी केले तर आभार हिना सौदागर यांनी मानले. या कार्यक्रमास नागरीक, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि.प.प्रा.शाळा-हिप्परगा
हिप्परगा (रवा) जि.प.प्रा. शाळेत क्रक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी. यावेळी क्रक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल अत नुरे व मुख्याध्यापक श्रीमती उलन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष शेवंताताई मोरे, यांच्यासह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शेख सौदागर, सुधीर घो डके, बंगले नागेश, परीट संभाजी, जाधव गोविंद, श्रीमती बिडवे, स्वाती श्रीमती, राठोड सविता, अदिंनी परिश्रम घेतले.
 
Top