वाशी /प्रतिनिधी-
 येथील छञपती शिवाजी विद्यालय व तालुका शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात वृतपञ सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधुन सोमवार (दि.६ ) रोजी पञकारांचा छञपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.बी.कोकाटे तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे व खजिनदार दिलीप रेवडकर यांची उपस्थीती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करुण अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे,चंद्रकांत भराटे ,भष्ट्राचार निर्मुलन समितीचे बापु कदम,विक्रम गपाट,शिक्षण विस्तार अधीकारी श्री गिराम यांच्यासह शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदिंची उपस्थीती होती.
यावेळी मुख्याध्यापक डी.बी.कोकाटे ,प्रा.शहाजी चेडे एम.आय.मुजावर यांनी आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या जीवण चरिञावर सखोल प्रकाश टाकुण समाजात वृतपञाचे असणारे महत्व पञकारांची भुमिका समाजाला वृतपञाची गरज आदिवर मार्गदर्शन केले. पत्रकार मुकुंद चेडे, गौतम चेडे ,नेताजी नलवडे, नवनाथ टकले,बळीराम जगताप,प्रा.शहाजी चेडे,एम.आय मुजावर,दादासाहेब लगाडे,विलास गपाट, शोएब काझी ,शिवाजी गवारे आदिंचा सत्कार  करण्यात आला.तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब चेडे यांनी केले.सुञसंचलन एस.एस.धारकर,बी.डी.कांबळे यांनी केले तर आभार ए.बी.डोके यांनी मानले.

 
Top