उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सोनिया मागासवर्गीय बहुउद्देशिय महिला शिक्षण संस्था, सोलापूर, संचलित शांताई अनाथाश्रम (सोलापुर) येथील अनाथ चिमुकल्यासोबत बेंबळी येथील रहिवासी तथा श्री विठ्ठल रूक्मिणी इको बायो डिझेल चे विक्रेता बाबासाहेब मोहन वाघुलकर यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत आपला जन्मदिवस  मोठया उत्साहात साजरा केला.
प्रारंभी इको बायो डिझेलचे विक्रेता बाबासाहेब वाघुलकर यांनी अनाथ चिमुकल्यासोबत केक कापुन वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्यांनी सर्व चिमुकल्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्या सोबत मैत्रीपुर्ण संवाद साधत त्यांना अपलस करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. यावेळी शांताई अनाथाश्रम येथील शिक्षक संजय जाधव, श्रेयश आबत्तीनी, किशोरकुमार यादव, श्रीराम म्हेत्रे यांच्यासोबत बेंबळी येथील किरण चव्हाण, आकाश पाटील, बाळासाहेब डावकरे, विशाल शहा व आश्रम शाळेतील चिमुकल्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

 
Top