उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी जमिन मोजणीचे पैसे न भरल्यामुळे खा.ओमराजे निंबाळकर यांनी ६ नोव्हेंबर रोजी रेल्वे अधिका-यांची बैठक आयोजित करून कामाला गती देण्याचा प्रयत्न केला होता. या रेल्वे मार्गाच्या कामाचा आपण प्रत्येक महिन्यात ७ तारखेला आढावा घेणार आहोत, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे खासदार ओमराजे निंबाळकर यंानी उस्मानाबादची महसूल यंत्रणा व रेल्वे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक ७ नोव्हेंबर रोजी घेतली. या बैठकीत ओमराजे निंबाळकर यांनी पैसे जमा केले का ? असा प्रश्न उपस्थित करताच महसूल अधिका-यांनी या रेल्वे मार्गासाठी शिंगोली, जमीन मोजनीचे ३ लाख ७ हजार ५०० रूपये फीस जमा केल्याचे सांगितले.
उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गाची घोषणा खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सोलापूर मध्ये केली होती.तर महाराष्ट्र सरकार ने या रेल्वे मार्गाच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम लोकसभा निवडणुकीपुर्वी मुंबईत उरकला होता. परंतू या कामाला गती कांही केल्या मिळत नव्हती. खा.ओमराजे निंबाळकर यांच्या हे लक्षात येताच रेल्वे मार्गाचा भुसंपादन प्रस्ताव दाखल करण्यासाठी कोणत्या समस्या आहेत. नेमकी कोठे आडचण येत आहे, प्रधानमंत्री यांनी घोषीत केलेल्या रेल्वे मार्गाच्या भुसंपादनासाठी का उशीर होत आहे, असे विविध प्रश्न विचारून खा.ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे अधिकारी व भुसंपादन अधिकारी यांच्या समन्वयाची बैठक नोव्हेंबर मध्ये घेतली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येक महिन्यात भुसंपादनाचे  पाच गांवचे प्रस्ताव दाखल करण्याची सूचना केली होती. गेल्या महिनाभरात एकमेव शिंगोली गांवचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर रेल्वे मार्गाच्या जमीन मोजणी पैसे रेल्वे विभाग ने भरले. यावेळी २२ डिसेंबर पर्यंत पाच गांवचे प्रस्ताव दाखल करण्याची सूचना खा.ओमराजे ङ्क्षनबाळकर यांनी दिली.एकुण २९ गांवच्या भुसंपादनाचा प्रस्ताव या रेल्वेमार्गासाठी असून शिंगोली नंतर अजून २८ गांवचा प्रस्ताव येणे बाकी आहेत. या बैठकीत ही खा.ओमराजे निंबाळकर यंानी रेल्वेच्या अधिका-यांना काही अडचणी असल्यास मला स्पष्ट सांगा, उच्च अधिका-यांना बोलायचे असल्यास मला संागा, रेल्वे मंत्र्यापर्यंत मी बोलू शकतो, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गाच्या कामासाठी गती मिळणार असल्याची अपेक्षा वाढली आहे.
या बैठकीस रेल्वेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.जी.जगदीश, भूमी अभिलेख चे उपाधिक्षक राक, उस्मानाबाद उप विभागाचे नायब तहसीलदार जे.व्ही.कदम, भुसंपादनाचे सी.एम.गोरे, रेल्वे विभागाचे इंजिनिअर नरूस्लम, शिवसेनेचे सतिश सोमाणी,रवी कोरे आळणीकर व पत्रकार उपस्थित होते.
 
Top