तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर येथील श्री खंडेरायाच्या उत्सवानिमित्ताने  शनिवार दि.7 रोजी सांळुके गल्ली येथे भक्तांसाठी अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ हजारो भाविक, भक्तांनी  घेतला.
येथील सांळुके गल्लीत प्राचीन खंडोबा मंदीरात नवराञोत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला.या पाश्र्वभूमीवर शनिवार दि.7 रोजी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास भाविकांमधुन मोठा प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने खंडोबा मुर्तीस श्री विठ्ठलाचे रुप देण्यात आले होते. श्री खंडेरायास नैवध दाखवून अन्नदान कार्यक्रमास आरंभ झाला याचा चार हजार भाविक भक्तांनी लाभ घेतला. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी  उत्सव समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.

 
Top