उस्मानाबाद/प्रतिनिधी -
उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी (दि.15) उस्मानाबाद जिल्ह्यासह रा’यभरातील हजारो स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी "पाणी वाचवा..जीवन वाचवा  चा संदेश दिला. या स्पर्धेत 45 वर्षावरील वयोगटात 21 किलोमीटरमध्ये  कोल्हापूर‘या पांडुरंग पाटील (1.28.59) यांनी तर 45 पेक्षा कमी वयोगटात उस्मानाबाद‘या कमल कुमार (1.1&.17) यांनी बाजी मारली. महिलांमध्ये शोभा देसाई कल्याण (1.58.&&) यांनी पहिला क्रमांक पटकावला.
 देशभरातून आलेल्या सुमारे & हजारावर स्पर्धकांनी स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेची सुरुवात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यां‘या हस्ते तुळजाभवानी क्रक्रीडा संकुल येथे झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन, निवासी उप-जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यां‘यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या मॅरेथॉनमध्ये शालेय विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ’येष्ठ नागरिक व तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. स्वयंसेवक म्हणून रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, तसेच एनसीसी, एनएसएस ‘या विद्याथ्र्यांंनी काम पाहिले. स्पर्धा पूर्ण करणाय-या प्रत्येक स्पर्धकांना मेडल, फिजिओथेरपी व अल्पोपहार देण्यात आला.
दिव्यांगाचा ही सहभाग
 स्पर्धेमध्ये दिव्यांग विद्याथ्र्यांनीही सहभाग नोंदवत आपली जिद्द दाखवून दिली. यामध्ये निवासी दिव्यांग शाळा सास्तूर, नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र, खानापूर शाळे‘या विद्याथ्र्यांची क्रक्रीडा संकुलावरच मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. तर श्री स्वामी समर्थ मूक-बधीर शाळेतर्फे पाणी वाचवा..जीवन वाचवा या महत्वा‘या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. राजकुमार कुंभार, शिराढोण यांनी साकारलेली 2500 चौरस फुटात साकारलेली भव्य रांगोळी, शहरातील सर्व शाळेतील विद्याथ्र्यांं‘या चित्रांचे प्रदर्शन स्पर्धेचे खास आकर्षण ठरले.
विजेते स्पर्धक
21 किलोमीटर - पुरूष- पांडुरंग पाटील-कोल्हापूर (45+) प्रथम, कमल कुमार-उस्मानाबाद (45-)प्रथम. महिला-शोभा देसाई-कल्याण (40+)प्रथम, ’योती गवते-परभणी(40-) प्रथम. पुरूष सिटी रनर-रितेश धोत्रे-उस्मानाबाद(18+)प्रथम, महिला-स्वामी शिंदे-प्रथम.
10 किलोमीटर - किलोमीटर-पुरुष-बालाजी कांबळे-सोलापूर (15+)प्रथम, महिला-श्रीदेवी सोमण्णा-सोलापूर(15+) प्रथम. सिटी रनर-यशराज बळीराम (15+) प्रथम, रोहीणी खापरे-बेंबळी-प्रथम. 5 किलोमीटर-10 ते 15 वर्षे मुले-सुमीत कनोजीया-प्रथम, मुली-अश्विनी तुरुकझाडे-परभणी-प्रथम. 
 
Top