बेंबळीत तरुण रोडरोमीयोच्या बंदोबस्तासाठी आक्रमक
उस्मानाबाद / प्रतिनिधी-
गेल्या काही महिन्यांपासून बेंबळी शहरात रोडरोमियोंनी उच्छाद मांडला असून त्यांचा त्रास विशेषतः शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली व गावातील महिला तसेच नागरिक यांना होत
आहे.तरी रोडरोमियोंचा तात्काळ व कायमचा बंदोबस्त करण्याचे निवेदन बेंबळी पोलीस स्टेशन चे ए.पी.आय.श्री शेख यांना देण्यात आले.
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की,बेंबळी गावात सरकारी तसेच खाजगी अश्या मिळून एकूण पाच शाळा व दोन ज्युनियर कॉलेज आहेत त्यामध्ये बेंबळी व परिसरातील 10 ते 15 गावच्या मुली शिक्षण घेतात त्यातच जिजामाता कन्या प्रशाला या मुलींच्या शाळेचे नवीन ठिकाणी स्थलांतर झाले आहे.त्या भागात विरळ लोकवस्ती असल्याने त्याचाच फायदा घेऊन बेंबळी व परिसरातील रोडरोमियोकडून मुलींची छेड काढणे,अश्लील भाषा वापरणे,अश्लील हावभाव करणे तसेच मुली पाहून टॉंट मारणे आदी प्रकार राजरोसपणे घडत आहेत.या रोडरोमियोंचा विशेषतःबाजार चौक बस स्टँड, सास्तुरे कॉर्नर बस स्टँड व बोरखेडा रोड बस स्टँड तसेच शाळेचा मार्ग या भागात जास्त त्रास होतो व याच धरतीवर मुलींच्या पालकांकडून हैद्राबाद सारखी घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.तसेच याच रोडरोमियोकडून जिल्हा परिषद च्या जुन्या इमारतीवर गांजा ओढण्याचा व जुगार खेळण्याचा प्रकार रोज उघडपणे चालू आहे याचा शाळकरी मुलांच्या बुद्धीवर वाईट परिणाम होत आहे तरी या गावगुंड रूपातील रोमियोचा तात्काळ पण कायमचा बंदोबस्त करण्यात यावा याविषयीचे निवेदन बेंबळी व उंबरेगव्हाण गावातील तरुणांनी एकत्र येऊन बेंबळी पोलीस स्टेशन चे ए.पी.आय.श्री मुस्तफा शेख यांना दिले. तरी यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन श्री शेख यांनी गावकरी तरुणांना दिले.