तुळजापूर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद पोलीस दल व उप विभाग तुळजापूर  यांच्या  संयुक्त विद्यमानाने बुधवार दि.11 रोजी पोलीस संकुल तुळजापूर येथे पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दल मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पोलीस प्रशासनास सहकार्य व मदत करणारे पोलीस पाटील, पोलीस मित्र व इतरांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. तसेच ग्रामीण भागामध्ये चो-या होऊ नये म्हणून प्रत्येक गावामध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून काही गावांना लाठी, कँप, शिट्टी चे वितरण करण्यात आले.  या प्रसंगी पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वर  रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्यासह उप विभागातील सर्व पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, उपस्थितीत होते.
 या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.हर्षवर्धन गवळी, पो.ना.अमोल कलशेट्टी,पो.ना.रवी भागवत, पो.ना.चक्रधर पाटील पो.स्टे.तुळजापूर व सपोनि श्री वाणखेडे पो.स्टे.नळदुर्ग, सपोनि श्री मिरकर पो.स्टे.तामलवाडी यांनी केले.त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
 
Top