तुळजापूर/प्रतिनिधी-
धर्माचा नावाने संसदेत मांडलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास आमचा विरोध असुन हा कायदा राज्यसभेत पारीत होण्याआधी त्यावर संशोधन करुन सर्व जातीतील लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद करावी. अन्यथा रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय असणार नाही, असा इशारा तहसिलदार यांना मुस्लिम नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अर्टिकल 14 प्रमाणे नागरिक कायदा समान आहे. यात धर्माचा नावावर भेदभाव करता येणार नाही, असे निवेदनात म्हटलं आहे. या निवेदनावर जावेद बागवान, युसुफ शेख, अँड महेबुब शेख , गौस बागवान आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top