तेर/प्रतिनिधी-मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार तेर येथील ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे याड्डना मुंबई येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक,सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ .प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची या सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर आणि कवी रमेश आव्हाड या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षणतंज्ञ मनिषा कदम घार्गे यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी प्रकाश सावंत, के. एल. गोगावले, लक्ष्मणराव दाते, चंद्रहास गावंड, रमेश खानविलकर, नारायण वाणी हे व्यासपीठावर उपस्थित होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी गुणिजन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अँड. कृष्णाजी जगदाळे विराजमान होते.