उस्मानाबाद /प्रतिनिधी-
शिक्षा संस्कृती उत्थान न्यास  नवी दिल्ली यांच्या महाराष्ट, राज्य प्रांताची संयोजक बैठक औरंगाबाद येथील महसूल प्रबोधनी औरंगाबाद येथे संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरकार्यवाह सुरेश उर्फ भैयाजी जोशी ,  शिक्षा संस्कृती उत्थान न्यास सचिव अतुल कोठारी, बाटु विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शास्त्री विशेष उपस्थिती हरियाणा राज्यातील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मित्तल यांनी देशभरातून मातृभाषेतून शिक्षणाची व्यवस्था व्हावी ह्या साठी विविध उपक्रमाची माहिती नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन केले तसेच मातृभाषा या विषयावर भैय्याजी जोशी यांचे जाहीर व्याख्यान ही आयोजित केले होते.
 शिक्षा संस्कृती उत्थान न्यास  व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी महिन्यात सीबीएससी पॅटर्न चा मराठी अनुवाद केलेल्या पाठ्यक्रमचा महाराष्ट्रभरातील सर्व शाळेतील विषय अध्यापकांचे   विषय व्यापक प्रशिक्षण कार्यशाळा 2019 चे आयोजन करण्यात येणार असून यासंबंधी मान्यवरांची उपस्थित बैठकीत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी चर्चा केली त्यानुषंगाने उस्मानाबाद येथे  मातृभाषा अनुवादित पॅटर्नची कार्यशाळा संपन्न होणार असून या कार्यशाळेस वरील मान्यवरांनी येण्याचे अगत्य करावे म्हणून या बैठकीत निवेदनही देण्यात आले.
 या बैठकीस प्रांत संयोजक संदेश सोनवणे, अश्विन रांजणीकर सोमनाथ काळे , श्री चंद्रकांत , अतुल सराफ ,उस्मानाबाद जिल्हा उप संयोजक शेषनाथ वाघ ,सदस्य राम मुंडे ,प्रवीण गोरे ,बालाजी जगताप देशभरातील सर्व शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 
Top