उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने अगदी कमी वेळेत खुप मोठे काम उभे केले असून येणा-या काळात अजिंक्य संस्था संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवेल व एक वेगळा आदर्श निर्माण करेल, संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम जवान व संस्थेचे सचिव राम जवान यांचे काम अगदी उत्कृष्ट आहे. येणा-या काळात संस्थेला चांगले काम करण्याची संधी मिळेल याचा फायदा खडकी व पंचक्रोशीतील गावांना होईल, असे प्रतिपादन डॉ. खासदार विकास महात्मे यांनी केले.
अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे हे होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात  राज्यभरातील 13 मान्यवरांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार तर राज्यातील पाच उत्कृष्ट संस्थेचा सन्मान खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे व संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम जवान यांच्या हस्ते देण्यात आले. आनंदराव देवकते महाविद्यालय वडजी, श्रीराम माध्यमिक विद्यालय धोत्री, जि.प शाळा खडकी या सर्व शाळेच्या विद्यार्थींची स्पर्धा परीक्षा व व्याख्यान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील प्रथम व द्वितीय क्रक्रमांक विद्यार्थींचा सन्मान करण्यात आला. यानंतर महा आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत तपासणी व गोळ्या-औषधे मोफत देण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत गायन झाल्यावर कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी म्हाळाप्पा सुरवसे, प्रकाश जवान,हणमंत शिंदे,भरत जवान,किशोर जवान, बालाजी जवान सिध्दु सुरवसे मतिन मुजावर अविनाश जवान यशवंत जवान बाळु भंडारे ज्ञानेश्वर जवान राम जवान मुरली भंडारे आकाश जवान  सचिन कोरे गणेश जवान बरगली सुरवसे, गौतम मस्के संतोष जवान,सत्यवान वाघमोडे, विलास जवान,बबर सुरवस यांनी परिश्रम घेतले.
पुरस्काराने सन्मान
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई चे उमाकांत मिटकर, विजय वरुडकर सह संस्थापक अध्यक्ष महाएनजीओ फेडरेशन, डॉ.लालासाहेब तांबडे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख क्रुषी विज्ञान केंद्र सोलापुर, अजित काळे ,डॉ. प्रल्हाद गुरव , काशिनाथ भतगुणकी, प्रा क्रुष्णा अलदार , लक्ष्मण आण्णा भोसले,  सोमनाथ आनोसे ,   मयुर बागुल , मारुती बनसोडे रूपेश भोसले सोलापुर यांच्या सह १८ गुणवंताचा स्मृतीचिंन्ह देवून सत्कार करण्यात आला.

 
Top