उस्मानाबाद / प्रतिनिधी -
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील पोलिस ठाण्यातील पोलीस हवलदार चंद्रसेन राऊत यांचा बदली निमित्त कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री राऊत यांची बीड जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यांनी बेंबळी गावात चांगल्या पद्धतीने सेवा बजावली. गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यामुळे त्यांचा पोलीस ठाण्यात यथोचित सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास अन्य पोलिस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.