उस्मानाबाद / प्रतिनिधी -
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे. अतिरेकी सजावट, फुगे फोडणे, मेणबत्त्या जाळणे, फटाके वाजवणे असा खर्च सध्या वाढदिवसाला करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. मात्र सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या बंद झाली आहे. क्वचितच असा उपक्रम पाहायला मिळत आहे. बेंबळी येथील ॲड. उपेंद्र कटके यांनी त्यांचा मुलगा समर्थ कटके याच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित केले. यामध्ये मुलांना चित्रकलेची आवड निर्माण होण्यासाठी ड्रॉइंग सीट व सिसपेन्सिल चे वाटप करण्यात आले. याचे वाटप पत्रकार गोविंद पाटील व नितीन खापरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षिका साकोळे मॅडम, प्रमोद हुगे यांच्यासह शिक्षक व नागरिक उपस्थित होते.