परंडा/प्रतिनिधी-
  तालुक्यातील मुगांव येथील जवान वैभव बालाजी गवंडी वय- 25 यांचे कर्तव्य बजावत असताना अकस्मात निधन झाले. राजस्थानमधील कोटा या ठिकानी सेवा बजावत होते. दि.13-12-19 रोजी सकाळी कर्तव्य बजावत असताना त्यांचे अकस्मिक निधन झाले.   त्यांचे पार्थीव दि.14 डिसेंबर रोजी 19 रोजी दुपारी तीनच्या सुमारास मुगाव या ठिकानी आणण्यात आले. नतंर पार्थिवाची गावातुन अंत्ययात्रा काढुन त्यांच्या शेतामध्ये त्यांच्यावर शासकीय इतमानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
 या वेळी नगर येथील जवानासह अंभी पोलीसा ठाण्यातील पोलीसांनी पार्थीवास सलामी दिली. या वेळी तहसील कार्यालयाच्या यांच्या वतीने नायब तहसीलदार गणेश सुपे, पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक बि.जी. पालवे, जि.प. सदस्य धनजंय सावंत, जिप गटनेते दत्ता साळुंके, सेनेचे जिल्हाप्रमुख गौतम लटके, सरपंच समाधान गरदाडे,समीर पठाण, अझर शेख, युवा सेना नेते पाटिल, तनपुरे मेजर, यांच्यासह विवीध मान्यवरांनी मेजर वैभव गवंडी यांना पुष्पचक्र अर्पण करुण श्रध्दाजंली वाहीली. या वेळी अंत्यसंस्कारासाठी पंचक्रक्रोशीतील हजारो नागरीक उपसस्थीत होते. मयत वैभव गवंडी यांच्या पश्चात आई - वडील, भाऊ, बहीण,आजी -आजोबा असा परिवार आहे.
 
Top