उस्मानाबाद/प्रतिनिधी-
विधान परिषदेतील भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांची महाराष्ट्र विधान परिषद कामकाज सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाली आहे.
आ. सुजितसिंह ठाकुर हे यापूर्वीची विधीमंळाच्या अंदाज समिती व गं्रथलय समितीवरही सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अमोघ वक्तृत्व व अभ्यासपूर्ण मांडणीद्वारे त्यांनी विधान परिषदेत आपल्या कार्यांची छाप सोडली आहे. या बळावरच त्यंाचे नाव आता विरोधी पक्षनेते पदासाठीही चर्चेंत आहे. दरम्यान, या निवडीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील, प्रदेश सदस्य नितीन काळे, नितीन भोसले, अॅड.खंडेराव चौरे, अॅड. व्यंकट गुंड, इंद्रजीत देवकते व पदाधिका-यांनी स्वागत केले.
 
Top