लोहारा/प्रतिनिधी-
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी व ईन्फोटेक ईव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी मुंबई यांच्या संयुत्त विद्येमाने दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र दादर मुंबई (महाराष्ट्र) येथे करजखेडा येथील रहिवाशी व  तालुक्यातील भातागळी येथील  जि.प.प्रा.शाळेतील शिक्षक तानाजी दबडे सर यांना राज्यस्तरीय गुणिजनरत्न जीवनगोरव पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिषेक जगदाळे (उपकार्याध्यक्ष गुणिजन गौरव महापरिषद मुंबई) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प शामसुंदर महाराज सोन्नर, रमेश आव्हाड , दत्ताञय सवताडेकर, सौ.अरुणा परब , श्रीमती हेमा मकवाना , श्री एल.एस दाते  अदि उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत तानाजी दबडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top