उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थी सुरक्षेवर चिंता व्यक्त केल्यानंतर आरटीओने जिल्ह्यात स्कूल बस चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियम मोडणा-या बसवर थेट जप्तीची कारवाई होत असल्याने विद्याथ्र्याना शाळेत पोहोचविणे अवघड झाले आहे जवळपास 50 पेक्षा अधिक वाहनावर कारवाई झाल्याने याचा फटका साधारण पाच हजार विद्याथ्र्यांंना बसला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षाभर शाळा चालू असताना आरटीओने स्कूलबसची तपासणी केली आहे का? केली नसेल तर का केली नाही ? एखादी दुर्घटना घडली असती तर त्यास कोन जिम्मेदार होते ? आदी विविध प्रश्र उपस्थित केले जात आहेत. शैक्षणीक वर्ष संपत आल्यावर आरटीओची स्कुलबसपर होत असल्याने मुलांना शाळेत सोडण्यास जावे लागत असल्याने त्यांना थंडीत घाम फुटत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
उस्मानाबाद शहराचा विस्तार होत असल्याने प्रत्येक वर्षी स्कूलबसच्या संख्येतही वाढ होत आहे रोजगारांच्या नवीन संधी म्हणून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना हा मोठा आधार ठरला आहे एखादे जुने वाहन खरेदी करून त्याला पिवळा रंग मारला की स्कूल बस तयार होते असा या तरुणांचा समज आहे प्रत्यक्षात आरटीओकडे नोंदणी करण्याचे प्रमाण खूप कमी आहे स्कूल बस साठी असलेल्या वेगळ्या नियमावली कडेही फारसे गांभीर्याने पाहिले जात नाह.ी अशा वाहनावर वेळीच कारवाई करण्याचे काम आरटीओकडून होत आहे. अशा वाहनामुळे विद्याथ्र्यांची सुरक्षा धोक्यात आह.े दृष्टीने दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. त्यानंतर राज्य सरकारने शपथपत्र दाखल केल्याने राज्यभरात नियमभंग करणा-या स्कूल बस चालकावर कारवाई सुरू झाली आहे.
वास्तविक आता डिसेंबर महिना सुरु झाला आहे जानेवारी पर्यंत पूर्णवेळ शाळा तर त्यानंतर बारावी दहावीच्या परीक्षा मुळे शाळा अर्धवेळ होतात परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धडपड असते विद्यार्थीही त्यादृष्टीने धडपडत असतो 5 डिसेंबर पासून आरटीओनी या कारवाईला थेट प्रारंभ केल्याने शहरातील स्कूल बस चालकाला धडकी भरली आहे शहरातील विविध शाळांमध्ये शहरालगतच्या खेडेगावातील मुलांना स्कूलबस हाच आधार असतो यापैकी बहुता स्कूल बसही कारवाईत अडकल्याने या बसवर अवलंबून असलेल्या विद्याथ्र्यांना शाळेतच पोहोचविणे अवघड झाले आहे तशीच परिस्थिती शहरातील उपनगरात राहणा-या विद्याथ्र्यांची झाली आहे. त्यामुळे पालकांची फरफट होऊ लागली आहे अभ्यासक्रम बुडत असल्याने विद्याथ्र्यांना ऐन थंडीत घाम फुटू लागला आहे.
27 वाहने जप्त
आरटीओकडून आतापर्यंत 60 वाहनावर कारवाई झाली आहे. यात 26 ऑटोरिक्षा आहेत.रिशांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नाही शिवाय त्यांना शाळेत सोडण्यास दुचाकीवरुन जाणाऱ्या तेरा पालकावर ही हेल्मेट नसल्याने कारवाई केली आहे तर 27 बस जप्त केल्या आहेत. यात सात खाजगी रिक्षाचा ही समावेश आहे. जिल्ह्यात 405 स्कूल बस ची नोंदणी आरटीओकडे आहे.
या प्रकरणात आरटीओ नेरपगार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता. दोन्ही वेळेस मोबाईलचा कॉल कट करण्यात आला. 
 
Top