तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर शहरात मोक्षदा एकादशी निमित्ताने गीता जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी  मोठ्या संख्येने महिला वर्गाची उपस्थिती होती
रविवारी विष्णुसहस्त्रनाम आणि गीता जयंती विधीवत पद्धतीने साजरी करण्यात आली. सोमवारी पारंपरिक पद्धतीने जयंतीच्या उत्सव चा समारोप म्हणून आरती करण्यात आली  आणि त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला हा उत्सव अनंत कोंडो यांच्या घरी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने परिसरातील महिला मोठ्या संख्यने या उत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या.तसेच यावेळी  गीता अभ्यासक  सौ. अश्विनी कोंडो, मीना मलबा, अपर्णा देवलालकर,  भाग्यश्री मलबा, वैष्णवीशामराज, वंदन मलबा,  आवटीताई,  संजीवनी प्रयाग, लीला कवठेकर, सुवर्णा चाटुफळे,  मनीषा साळुंके आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.
 
Top