तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील महावितरणचा डीपी जळाल्याने शेतक-यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक जोडण्या असल्याने डीपी जळाल्याचा आरोप करण्यात येत असून तातडीने डीपी दुरूस्त करण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.
कुंभारी येथील स्वामी डीपी जळाला असून ऐन पाणी देण्याच्या वेळेस डीपी जळाल्याने हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी डीपीवर क्षमतेपेक्षा अधिक वीज जोडण्या असून बोगस जोडण्यामुळेच डीपी जळाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

 
Top